नवाब तैमूरचा फोटो व्हायरल

डोक्यावर टोपी घालून बाबागाडीत बसलेला हा छोटा नवाब आतापासूनच त्याचा थाट अनुभवत आहे असं म्हणायला हरकत नाही. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 9, 2017, 01:09 PM IST
नवाब तैमूरचा फोटो व्हायरल title=

मुंबई : सेलिब्रिटी किड्समध्ये तैमुरच्या नावाचीच चर्चा होत आहे. तैमूरचा एक फोटो सर्वांना चांगलाच आवडला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तैमूर हा करिना कपूर आणि सैफ अली खान यांचा मुलगा आहे.

डोक्यावर टोपी घालून बाबागाडीत बसलेला हा छोटा नवाब आतापासूनच त्याचा थाट अनुभवत आहे असं म्हणायला हरकत नाही. 

सैफच्या या छोट्या नवाबाची पहिली झलक जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाली होती तेव्हाही चाहत्यांनी तैमुरच्या फोटोला पसंती दिली होती. बाळाच्या येण्याने सध्या प्रचंड आनंदात असणारा 'डॅडी' सैफ तैमुरला फार काळासाठी स्वत:पासून दूर ठेवत नाहीये ही बाबही तितकीच महत्त्वाची.

बॉलिवूडची बेबो करिना कपूर खान आणि अभिनेता सैफ अली खान यांच्या कुटुंबाचा त्रिकोण २०१६ च्या डिसेंबर महिन्यात पूर्ण झाला. 'सैफिना'च्या जीवनात छोट्या नवाबाचं आगमन झालं आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबात आणि प्रेक्षक वर्गातही आनंदाची लाट पसरली.