मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि आलिया भट यांच्यामध्ये सध्या कोल्ड वॉर सुरु असल्याचं बोललं जात आहे. या दोघींमधल्या या वादाला अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा जबाबदार असल्याचं बोललं जात आहे.
सिद्धार्थ आणि श्रद्धाला घेऊन पुन्हा एकदा एक निर्माता-दिग्दर्शक चित्रपट बनवणार होता, पण आलियानं याला विरोध केला. एक व्हिलन चित्रपटाच्या शूटिंगवेळी श्रद्धा आणि सिद्धार्थ यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली होती. ही मैत्री आलियाला खटकल्यामुळे तिनं सिद्धार्थ-श्रद्धाच्या पुन्हा एकत्र काम करण्याला विरोध केल्याची चर्चा आहे.