आलियाच्या 'उंची'नं गमावला सिनेमा!

मुंबई : दिग्दर्शक राम माधवानीच्या 'नीरजा' या सिनेमातील सोनम कपूरनं सर्वांनाच भुरळ घातली. 

Updated: Mar 17, 2016, 10:16 AM IST
आलियाच्या 'उंची'नं गमावला सिनेमा! title=

मुंबई : दिग्दर्शक राम माधवानीच्या 'नीरजा' या सिनेमातील सोनम कपूरनं सर्वांनाच भुरळ घातली. नीरजा या हवाई सुंदरीच्या भूमिकेतील सोनम कपूर सर्वांच्याच पसंतीस उतरली. सोनमने आजवर केलेल्या भूमिकांमधील ही सर्वोत्कृष्ट भूमिका असल्याचं सांगत अनेकांनी तिचं कौतुकही केलं.

पण 'बॉलिवूडलाईफ डॉट कॉम'ने दिलेल्या एका बातमीनुसार सोनम कपूर नीरजाच्या भूमिकेसाठी निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती. या भूमिकेसाठी चित्रपटाच्या निर्मात्यांची पहिली पसंती होती ती आलिया भटला... पण, एका विचित्र कारणामुळे आलियाने ही भूमिका गमावली.

...हे होतं कारण!
ते कारण म्हणजे आलियाची उंची... आलिया भट सोनम कपूरपेक्षा पाच इंच उंच आहे. त्यामुळे हवाईसुंदरीच्या भूमिकेसाठी तिची उंची तिच्या आड आली. पण, चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा दावा फेटाळला आहे. त्यांच्या मते सोनमलाच या भूमिकेसाठी त्यांची पहिली आणि शेवटची पसंती होती.

आता या चित्रपटाला इतकं यश मिळाल्यावर खरं तरी कोण बोलेल?