मुंबई: कंगना राणावत आणि ऋतिक रोशन यांच्यामधला वाद विकोपाला गेला आहे. या सगळ्या वादावर बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारनं प्रतिक्रिया दिली आहे. या दोघांमधला वाद लवकरच संपेल अशी अपेक्षा अक्षयनं व्यक्त केली आहे.
कंगनानं ऋतिकचा उल्लेख सिली एक्स असा केला, त्यानंतर भडकलेल्या ऋतिकनं कंगनाला कायदेशीर नोटीस पाठवली, तर यानंतर कंगनानंही ऋतिकला कायदेशीर नोटीस पाठवून प्रत्युत्तर दिलं.
अक्षय कुमार आणि ऋतिक एकाच अपार्टमेंटमध्ये राहतात. माझ्या बिल्डिंगमध्ये सध्या युद्ध सुरु असल्याचंही अक्षय म्हणाला आहे. या सगळ्या गोष्टी आता शांततेतून संपवल्या पाहिजेत, असा सल्लाही अक्षयनं या दोघांना दिला आहे.