फोटो : तुझ्यात जीव रंगलामध्ये 'राणा'सोबत अक्षय कुमार

 प्रेमाची जाणीव करुन देण्यासाठी त्याच्या मदतीला येतोय जगदीश्वर मिश्रा उर्फ जॉली म्हणजेच बॉलिवुडचा सुपरस्टार अक्षयकुमार. आपल्या आगामी ‘जॉली एलएलबी २’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीकरीता अक्षय कुमार या मालिकेत बघायला मिळणार आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेचे हे विशेष भाग १ आणि २ फेब्रुवारीला सायंकाळी ७.३० वा. झी मराठीवरुन प्रेक्षकांना बघायला मिळतील.   

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 25, 2017, 06:10 PM IST
फोटो : तुझ्यात जीव रंगलामध्ये 'राणा'सोबत अक्षय कुमार  title=

मुंबई :  प्रेमाची जाणीव करुन देण्यासाठी त्याच्या मदतीला येतोय जगदीश्वर मिश्रा उर्फ जॉली म्हणजेच बॉलिवुडचा सुपरस्टार अक्षयकुमार. आपल्या आगामी ‘जॉली एलएलबी २’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीकरीता अक्षय कुमार या मालिकेत बघायला मिळणार आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेचे हे विशेष भाग १ आणि २ फेब्रुवारीला सायंकाळी ७.३० वा. झी मराठीवरुन प्रेक्षकांना बघायला मिळतील.   

 
 अंजलीचा मित्र कल्पेश तिला आणि राणाला घेऊन एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गेलाय जिथे राणाची गाठ जॉलीशी पडते. याठिकाणी कल्पेश कपड्यांवरुन आणि भाषेवरुन राणाची टर उडवतो. यामुळे राणाचा आत्मविश्वास कमी होतो. याचवेळी एका ज्येष्ठ वकिलाची भेट घेण्यासाठी आलेला जॉली हा सगळा प्रकार बघतो आणि तो राणाला गाठून त्याला आपला ‘वकीली’ सल्ला देतो.

 राणाच्या मनात असलेल्या अंजलीबद्दलच्या भावना कशा ख-या आहेत आणि हे प्रेम कसं यशस्वी होईल याबद्दलचा विश्वास तो राणाला देतो. यामुळे राणाचाही आत्मविश्वास बळावतो आणि अंजलीला आपल्या मनातील भावना सांगण्यासाठी तो तयार होतो.
 

‘तुझ्यात जीव रंगला’च्या या विशेष भागाचं चित्रीकरण नुकतंच एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडलं.  आजवर या मालिकेचं चित्रण कोल्हापूरच्या जवळच्या भागात, शेतात पार पडत होतं यानिमित्ताने पहिल्यांदाच बाहेरच्या ठिकाणी चित्रीकरण होणार असल्यामुळे कलाकारही उत्साही होते. 

सुपरस्टार अक्षयकुमारच्या उपस्थितीने सेटवरचं सारं वातावरणचं भारावून गेलं होतं.  

अक्षयच्या येण्याने कलाकार उत्सुक होतेच पण थोडसं दडपणही होतं परंतु त्याने आपल्या खेळकर स्वभावाने हे दडपण दूर केलं. त्याने सेटवर सर्व कलाकारांशी, लेखक-दिग्दर्शकाशी छान गप्पा मारल्या.