अनैतिक संबंध असल्याने अभिनेत्रीवर ३ वर्ष बॅन

एका साऊथच्या अभिनेत्रीवर एका अॅक्टरसोबत अनैतिक  संबंधांचा आरोप असल्याने फिल्म इंडस्ट्रीने या अभिनेत्रीवर ३ वर्षाचा बॅन लावला आहे. अभिनेत्री निकिता ठकराल ३ वर्ष सिनेमात दिसली नाही.

Updated: Jun 13, 2016, 06:05 PM IST
अनैतिक संबंध असल्याने अभिनेत्रीवर ३ वर्ष बॅन title=

मुंबई : एका साऊथच्या अभिनेत्रीवर एका अॅक्टरसोबत अनैतिक  संबंधांचा आरोप असल्याने फिल्म इंडस्ट्रीने या अभिनेत्रीवर ३ वर्षाचा बॅन लावला आहे. अभिनेत्री निकिता ठकराल ३ वर्ष सिनेमात दिसली नाही.

अभिनेत्री निकिताने बॉलिवूडच्या 'ट्रॅफिक' सिनेमामध्ये काम केलं आहे. याआधी तिने तमिळ, तेलगु, मल्याळम आणि कन्नड भाषेतील सिनेमांमध्ये काम केलं आहे. आजही ती साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये तिचं नाव घेतलं जातं. 2011 मध्ये निकितावर कन्नड अॅक्टर टी दर्शनसोबत अवैध संबंध असल्याच्या चर्चो रंगल्या होत्या. हा आरोप दर्शनची पत्नी विजय लक्ष्मीने केला होता. निकितासोबत असलेल्या संबंधांमुळे तो तिला मारहाण करत असल्याचं तिने म्हटलं होतं. 

विजयलक्ष्मीने या विरोधात हिंसेची तक्रार नोंदवली होती. यानंतर दर्शनला अटक देखील झाली होती. पण काही दिवसांनी विजयलक्ष्मीने तक्रार मागे घेतली. त्यामुळे दर्शनला सोडून देण्यात आलं होतं. पण अवैध संबंधाचे आरोप असल्याने कन्नड फिल्म प्रोड्यूसर्स असोसिएशनने ३ वर्षासाठी तिला बॅन केलं होतं.