मुंबई : बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी अभिनेता संजय दत्त तुरुंगवास भोगून बाहेर पडलाय. त्याने मीडियाला माहिती देताना सांगितले, मी जे जेलमध्ये खाल्ले, ते गाढवसुद्धा खाणार नाही.
संजयने शुक्रवारी एका कार्यक्रमात तुरुंगातील आणि खासगी आयुष्यातील अनेक अचंबित करणाऱ्या गोष्टींचा उलगडा केला. 'तुरुंगात मी जे अन्न खाल्ले ते गाढवसुद्धा खाऊ शकणार नाहीत', असे संजयने यावेळी सांगितले. माझ्या दिवसाची सुरुवात ही जेलमध्ये दररोज रडून व्हायची. तसेच सिक्युरिटीच्या कारणामुळे मला तुरुंगात एकटे ठेवण्यात आले होते. तेथे रोज सकाळी सहा वाजता मी उठायचो आणि कुटुंबीयांच्या आठवणीत रडायचो, असे त्यांने सांगितले.
वर्षभर मी तेथे केवळ चना डाळ घेतली. तेथे मला जेवणात राजगिराची भाजी मिळायची. या भाजीचे नावे मी जेलमध्येच प्रथमच ऐकले. ती भाजी तुम्ही बकरी, बैल किंवा गाढवा यांना दिली तरी ते खाणारच नाहीत, असे संजय दत्तने म्हटलेय.
तुरुंगात मला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली, ही गोष्ट खोटी आहे. इतर कैद्यांच्या तुलनेत माझ्यासोबत अतिशय वाईट व्यवहार केलाय जायचा. जणू मी इंग्रजांच्या काळात जगतोय, असे मला वाटायचे.
दरम्यान, मी माझ्या वडिलांना ड्रग्स घेत असल्याची गोष्ट सांगितली होती. त्यानंतर मला ट्रीटमेंटसाठी यूएसला पाठवण्यात आले होते. त्या गोष्टीला आता ४० वर्षांचा काळ लोटला आहे. मी आता ड्रग्सकडे वळूनही पाहिलेले नाही. मी माझ्या पालकांना खूप दुःख दिले आहेत, मात्र आता मी चांगला माणूस बनलोय, असे तो म्हणाला.
असा असायचा दिनक्रम :
- सकाळी लवकर उठल्यानंतर वर्कआउटनंतर अंघोळ करायचो आणि शिव पुराण, गणेश पुराण, महाभारत, भगवतगीता आणि रामायणाचा पाठ करायचो. तेथे मी पंडितच झालो होतो.
- फिट राहण्यासाठी मी दररोज दोन तास धावायचो. बादल्यांमध्ये पाणी भरुन ते झाडांना घालायचो. पोट कमी करण्यासाठीसुद्धा मी व्यायाम केला.