हैदराबाद : 'सिंघम'फेम गुंड अभिनेते प्रकाश राज यांनी रिअल लाईफमध्ये आपण खरोखरच 'हिरो' असल्याचं आपल्या कृत्यातून दाखवून दिलंय.
प्रकाश राज यांनी सोमवारी तेलंगणाचे माहिती तंत्रज्ञान आणि पंचायत राज मंत्री के. टी. रामाराव यांची हैदराबादमध्ये भेट घेतली... आणि त्यांच्यासमोर मेहबूबनगर जिल्ह्यातील कोंडारेड्डीपले हे गाव दत्तक घेण्याची इच्छा दर्शवली.
रामाराव यांनी ही माहिती आपल्या फेसबुक पेजवरदेखील दिलीय. सोबतच प्रकाश राज आणि आपले काही फोटोही त्यांनी फेसबुक पेजवर अपलोड केलेत.
यापूर्वी, दाक्षिणात्य अभिनेते महेश बाबू यांनीदेखील आपल्याला यांनी बुरिपालेम नावाचं गाव दत्तक घेण्याची इच्छा दर्शवली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.