कमल हासनला रुग्णालयातून सुट्टी, आरामाचा सल्ला

 गेल्या दोन आठवड्यापूर्वी पायला जखम झाल्यामुळे एका खासगी रुग्णालयात दाखल असलेले सुप्रसिद्ध अभिनेता कमल हासन यांना शुक्रवारी रुग्णालयातून सुट्टी मिळाली आहे. 

Updated: Aug 5, 2016, 06:50 PM IST
कमल हासनला रुग्णालयातून सुट्टी, आरामाचा सल्ला  title=

चेन्नई :  गेल्या दोन आठवड्यापूर्वी पायला जखम झाल्यामुळे एका खासगी रुग्णालयात दाखल असलेले सुप्रसिद्ध अभिनेता कमल हासन यांना शुक्रवारी रुग्णालयातून सुट्टी मिळाली आहे. 

कमल हासन यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कमल सरांना आज सकाळी सुट्टी देण्यात आली आहे. ते अजूनही संपूर्ण बरे झाले नाहीत. त्यांना चालण्यात त्रास होत आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना काही आठवडे आराम करण्यास सांगितले आहे. 

गेल्या महिन्यात आपल्या ऑफीसच्या पायऱ्यांवरून पडून जखमी झाले होते.  त्यांचे एक हाड मोडले होते. त्याचा इलाज सुरू होता. या अपघातामुळे त्यांनी त्रिभाषी चित्रपट ‘शाबाश नायडू’ची शुटींग बंद केली होती.