'शिवाजी अंडरग्राऊंड'च्या गाडीचा अपघात

नंदू माधव दिग्दर्शित शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकाच्या गाडीला बीड जिल्ह्यातील माजलगावंजवळ अपघात झाला.

Updated: Mar 12, 2016, 07:36 PM IST
'शिवाजी अंडरग्राऊंड'च्या गाडीचा अपघात title=

बीड: नंदू माधव दिग्दर्शित शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकाच्या गाडीला बीड जिल्ह्यातील माजलगावंजवळ अपघात झाला. नांदेडमध्ये नाटकाचा प्रयोग होता. 

यासाठी कलाकारमंडळी ट्रेनने गेली होती. मात्र बॅक स्टेजचे काही कलाकार सामानासह टेम्पोमधून परतत असतांना माजलगावजवळ टेम्पो पलटी झाला. यामध्ये ड्रायव्हरसह एक कलाकार जखमी झाला. तर आनंद मोघे या बॅक स्टेज कलाकाराचा अपघातात मृत्यू झाला.

जखमींवर माजलगावच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती समजताच कलाकार मंडळीही घटनास्थळी रवाना झाली आहेत.