ज्युनिअर बच्चन पुन्हा एकदा पडला प्रेमात

बॉलिवूडचा ज्युनिअर बच्चन पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे. आता ऐश्वर्या राय सारखी सुंदर बायको असतांना हा आणखी कुणाच्या प्रेमात पडला असा प्रश्न पडला असेल. तर ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून अभिषेक पुन्हा एकदा ऐशच्या प्रेमात पडला आहे. 

Updated: May 18, 2016, 11:23 PM IST
ज्युनिअर बच्चन पुन्हा एकदा पडला प्रेमात  title=

मुंबई : बॉलिवूडचा ज्युनिअर बच्चन पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे. आता ऐश्वर्या राय सारखी सुंदर बायको असतांना हा आणखी कुणाच्या प्रेमात पडला असा प्रश्न पडला असेल. तर ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून अभिषेक पुन्हा एकदा ऐशच्या प्रेमात पडला आहे. 

ऐशने कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर हजेरी लावली होती. सोनेरी रंगाच्या गाऊनमध्ये असलेल्या ऐश्वर्याचे फोटो बघून मी पुन्हा एकदा ऐश्वर्याच्या प्रेमात पडल्याचं अभिषेक बच्चनने सोशल मिडीयावर लिहीलं आहे.ऐशने ईली साबने डिझाईन केलेला गोल्डन कलरचा हॉट गाऊन कान्समध्ये परिधान केला होता. 

ऐशचा हा हॉट अंदाज चर्चेचा विषय ठरला. 42 वर्षीय ऐशने यावळी उपस्थितांची वाहवा मिळविली.त्यामुळे अभिषेकही ऐशवर फुल टू लट्टु झाला आहे.

फिल्मफेअरच्या कव्हरपेजवर अशी दिसेल ऐश्वर्या