आमिरने २१,००० मुलींना केलं 'रिजेक्ट'

बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्टनिस्ट' आमिर खान सध्या त्याच्या अगामी 'दंगल' या सिनेमाच्या तयारीत व्यस्त आहे. या सिनेमात आमिर चार मुलींच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटातील त्याच्या चार मुलींच्या भूमिकेसाठी मुलींचा शोध सुरु आहे. त्यासाठी आतापर्यंत तब्बल २१,००० मुलींची ऑडिशन घेण्यात आली आहे. 

Updated: Apr 7, 2015, 02:42 PM IST
आमिरने २१,००० मुलींना केलं 'रिजेक्ट' title=

मुंबई : बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्टनिस्ट' आमिर खान सध्या त्याच्या अगामी 'दंगल' या सिनेमाच्या तयारीत व्यस्त आहे. या सिनेमात आमिर चार मुलींच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटातील त्याच्या चार मुलींच्या भूमिकेसाठी मुलींचा शोध सुरु आहे. त्यासाठी आतापर्यंत तब्बल २१,००० मुलींची ऑडिशन घेण्यात आली आहे. 

अंदाज असे लावले जात आहेत की, या भूमिकांसाठी सर्वसाधारण मुलींचा शोध सुरू आहे. ज्या याआधी कधीही सिनेमात दिसलेल्या नसतील. 

या भूमिकांच्या कास्टिंगसाठी विविध शहरांत ऑडिशन घेण्यात आल्या आहेत. या कास्टिंगबद्दल आमिर, सिमेमाचा दिग्दर्शक आणि निर्माता सगळे गंभीर आहेत. त्यासाठी तब्बल २१,००० मुलींची ऑडिशन घेण्यात आली आहेत. 

याच सिनेमासाठी आमिर ९० किलोपर्यंत वजन वाढवलं आहे. जोपर्यंत परफेक्ट मुलगी मिळणार नाही तोपर्यंत सिनेमाची शुटींग सुरूही होणार नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.