आमिरने वाढविले तब्बल ९० किलो वजन

बॉलिवुडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खान आता "दंगल" करण्यासाठी सज्ज झाला आहे. "दंगल" या अगामी चित्रपटासाठी आमिरने चक्क ९० किलो वजन वाढवलं आहे.

Updated: Mar 13, 2015, 06:41 PM IST
आमिरने वाढविले तब्बल ९० किलो वजन  title=

मुंबई : बॉलिवुडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खान आता "दंगल" करण्यासाठी सज्ज झाला आहे. "दंगल" या अगामी चित्रपटासाठी आमिरने चक्क ९० किलोपर्यंत वजन वाढवलं आहे.

आमिर आपल्या चित्रपटांबाबत किती प्रामणिक असतो हे सर्वांनाच ठाऊक आहे. चित्रपटातील भूमिकेला न्याय देण्यासाठी तो भूमिकेचा पूर्ण अभ्यास करतो आणि त्याप्रमाणे स्वत:मध्ये बदल नेहमीच करतो. आता तो त्याच्या अगामी "दंगल" चित्रपटात कुस्तीपटूच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेला न्याय देण्यासाठी त्याने चक्क ९० किलोपर्यंत वजन वाढवले आहे. तसेच हरियाणी भाषा आणि कुस्तीचे डावपेचही तो शिकत आहे. 

आमिर भारताच्या कुस्तीपटू गीता, बबिता आणि संगिता यांचे वडील आणि कुस्तीपटू महावीर फोगट यांच्या भूमिकेत दिसणार आहे. आमिरच्या 'सत्यमेव जयते' या कार्यक्रमातही महावीर फोगट आणि त्यांच्या मुलींनी उपस्थिती लावली होती.

नितेश तिवारी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून चित्रीकरणाला एप्रिल महिन्यापासून सुरूवात होणार आहे. 

यापूर्वीही मंगल पांडेसाठी आमिरने मिशी वाढविली होती. गझनीसाठी त्याने टक्कल केले होते. 'थ्री इडियट्स'साठी त्याने वजन कमी केले होते.