खरोखर घडलीय 'बजरंगी भाईजान'ची कथा

23 वर्षीय जाहिद पाशाचं आयुष्य म्हणजे एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाहीय. 

Updated: Jul 16, 2015, 06:11 PM IST
खरोखर घडलीय 'बजरंगी भाईजान'ची कथा title=

मेवाड, हरियाणा: 23 वर्षीय जाहिद पाशाचं आयुष्य म्हणजे एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाहीय. 

15 वर्षांपूर्वी जाहिदचं हरियाणाच्या मेवाड इथून अपहरण झालं होतं, कारण तो एका हत्येचा साक्षीदार होती. अपहरणकर्त्यानं जाहिदला त्याच्या घरापासून 2500 किलोमीटर दूर कर्नाटकात सोडून दिलं. त्यावेळी त्याचं वय होतं अवघं 8 वर्ष... 

मस्जिदमध्ये थांबला
जाहिदला कसं तरी एका मस्जिदमध्ये थांबायला जागा मिळाली. तिथून एक केबल ऑपरेटर फारुख पाशा त्याला आपल्यासोबत घेऊन गेला. जाहिद फारुखचा सहाय्यक म्हणून काम करत मोठा होत होता आणि त्याचं लग्नही झालं.

'सेल्फी विथ डॉटर'मुळे मिळाला सरपंचाचा मोबाईल नंबर

जाहिद आपल्या गावाचं नाव आणि वडिलांचं नाव सोडलं तर सगळं विसरला होता. मात्र एक दिवस हरियाणाच्या जींद तालुक्यातील बीबीपूर गावातील सरपंच सुनील जागलान यांचा फोन नंबर 'सेल्फी विथ डॉटर' नावाच्या कार्यक्रमात दाखवला होता. जाहिदनं फोन नंबरवर फोन करून घटना सांगितली आणि त्याच्या गावाचा पत्ता लावण्याची विनंती केली.

ईदला भेटणार आपल्या कुटुंबियांना जाहिद

सुनील जागलानं गावांत शोध सुरू केला आणि अखेर अनेक प्रयत्नांनी त्यांना हरियाणातील सुनेदा गाव सापडलं. जिथं जाहिद पिता अकबरसोबत राहायचा. आता 15 वर्षांनंतर यंदा ईदच्या दिवशी जाहिद आपल्या कुटुंबियांना भेटणार आहे. 

दरम्यान, सलमान खानचा बजरंगी भाईजान शुक्रवारी रिलीज होतोय. यातही अशीच कथा दाखवण्यात आलीय. सलमान खानच्या या चित्रपटाबाबत सर्वांनाच खूप उत्सुकता आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.