मुंबई : कॉमन मॅन आर के लक्ष्मण यांचा गूगड-डूडलने अनोखा ९४ वा वाढदिवस साजरा केलाय. आपल्या पेजवर कॉमन मॅन गूगड-डूडल अपलोड केलेय.
आर के लक्ष्मण या नावाने प्रसिद्ध असणारे कॉमन मॅन यांचे नाव रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण आहे. २४ ऑक्टोबर १९२१ रोजी त्यांचा जन्म झाला. ते कार्टूनकार होते. त्यांची अनेक कार्टून मराठी, हिंदी आणि इंग्रजी वृत्तपत्रात येत होती. त्यातून सामान्यांच्या प्रतिक्रियांची जाणीव दिसायची. त्यांनी आपल्या कार्टूनमध्ये सामान्य माणूस जीवंत ठेवला.
त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात द फ्री प्रेस जर्नलपासून केली. त्याआधी ते अशंकालीन म्हणून स्थानिक वृत्तपत्रात कार्टून काढत होते. राजकीय कार्टून काढण्यात ते माहीर होते. त्यांचा तो छंद होता. त्यांचे 'कॉमन मॅन' हे चरित्र खूप गाजले. तेव्हापासून त्यांची कॉमन मॅन म्हणून अधिक गणना होऊ लागली.
दरम्यान, ऑक्टोबर २०१२ मध्ये पुणे येथे लक्ष्मण यांचा ९१वा वाढदिवस साजरा केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शास्त्रज्ञ जयंत नारळीकर आणि सिम्बायोसिस विद्यापीठाचे कुलगुरू एस बी मुजूमदार सहभागी झाले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.