बॉलीवूडमध्ये दीपिका पदुकोण कशी आली?

दीपिका पदुकोणला चित्रपटसृष्टीत पदार्पण करून ९ वर्ष झाली आहेत. दीपिकाने आपल्या जीवनात अनेक बदल केले, त्यानंतर तिला बॉलीवूडमध्ये मोठं यश संपादन करता आलं, मात्र दीपिकाच्या आयुष्यात अनेक फॅक्टस आहेत, त्या फार कमी लोकांना माहित आहे.

Updated: Jan 27, 2016, 10:54 AM IST
बॉलीवूडमध्ये दीपिका पदुकोण कशी आली?  title=

मुंबई : दीपिका पदुकोणला चित्रपटसृष्टीत पदार्पण करून ९ वर्ष झाली आहेत. दीपिकाने आपल्या जीवनात अनेक बदल केले, त्यानंतर तिला बॉलीवूडमध्ये मोठं यश संपादन करता आलं, मात्र दीपिकाच्या आयुष्यात अनेक फॅक्टस आहेत, त्या फार कमी लोकांना माहित आहे.

दीपिकाच्या जीवनातील १५ फॅक्टस

  1. रेशमियाचा म्यूझिक व्हिडीओ "नाम है तेरा" मध्ये दीपिका पहिल्यांदा दिसली होती. तेव्हा फराहने पहिल्यांदा तिला नोटीस केलं होतं.
  2. सावरियां चित्रपटासाठीही पहिल्यांदा दीपिकाचं नाव समोर आलं होतं, मात्र भन्साळीने नंतर सोनम कपूरला निवडलं
  3. सावरियां आणि ओम शांती ओम एकाच दिवशी रिलीज झाले, ओम शांती ओम सुपर हिट झाला, तर सावरियां वाईट पडला.
  4. कॉकटेलमध्ये वेरोनिकाचा रोल दीपिकानेच निवडला होता, मेनलीड रोड सोडून तिने ही भूमिका स्वीकारली होती.
  5. दीपिकाने महाराष्ट्राच्या अंबेगावला दत्तक घेतलं आहे, या गावाच्या देखभालीची, सोयी सुविधांची जबाबदारी तिने घेतली आहे.
  6. दीपिकाच्या एका जवळच्या मित्राचं मानलं तर ती लगेच कुणावरही विश्वास करत नाही.
  7. जब तक है जान, धूम ३ साठी ओरिजन चॉईस दीपिका होती, दीपिकाने नाकारल्यानंतर कॅटरिना कैफला ही भूमिका मिळाली
  8. दीपिकाने आपला पहिला सिनेमा ओम शांती ओम आणि चाँदनी चौक टू चायनामध्ये डबल रोल केला होता.
  9. डेब्यू फिल्म ओम शांती ओममध्ये दीपिकाचा आवाज नव्हता तर तो डब करण्यात आला होता. दीपिकाच्या भूमिकेसाठी मोना घोष-शेट्टीने आवाज दिला होता.
  10. आपल्या तीन वर्षाच्या करिअरमध्ये दीपिकाने शाहरूख सोबत तीन सिनेमे केले तीनही सुपर हिट झाले. ओम शांती ओम, चेन्नई एक्स्प्रेस, हॅप्पी न्यू एअर.
  11. सलमान खान सोबतही दीपिकाने तीन सिनेमे केले, सुल्तान, शुद्धी, आणि किक.
  12. किंगफिशर कॅलेंडर गर्ल होण्याआधी दीपिकाने, लिरिल साबणाची जाहिरात केली होती, ही जाहिरात ती मॉडेलिंग करत होती त्या काळात होती.
  13. दीपिका पहिल्यांदा 'पायरेट : अबाऊट म्यूझिक पायरसी' या प्रियदर्शनच्या चित्रपटात काम करणार होती, मात्र हा सिनेमा अजून आला नाही. 
  14. दीपिका कोरिओग्राफर श्यामक डावरकडून डान्स शिकली आहे.
  15. आपल्या दमदार अॅक्टिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या दीपिकाने अनुपम खेरकडून अॅक्टिंगचे धडे घेतले आहेत.