आमिर खानचा प्रमोशन नवा फंडा 'PK आना'

बॉलिवूडचा अभिनेता आमिर खान याचा चर्चेत असणारा सिनेमा 'पीके' रिलीज होण्याला काही दिवस बाकी आहे. मात्र, आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी त्याने चक्क ‘pk aana’ असे ट्वीट केलंय.

Updated: Dec 10, 2014, 07:04 PM IST
आमिर खानचा प्रमोशन नवा फंडा  'PK आना' title=

मुंबई : बॉलिवूडचा अभिनेता आमिर खान याचा चर्चेत असणारा सिनेमा 'पीके' रिलीज होण्याला काही दिवस बाकी आहे. मात्र, आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी त्याने चक्क ‘pk aana’ असे ट्वीट केलंय.

सोशल नेटवर्किंग साईटवर ट्विटर आमिरने आपल्या चाहत्यांना 'पीके' सिनेमा पाहण्यासाठी येण्याचे आवाहन केले आहे. मला सिनेमा रिलीज होण्याबाबत उत्सुकता आहे. माझ्या सिनेमाचे काऊनडाऊन सुरु आहे. सिनेमा रिलीज होण्यासाठी केवळ १० च दिवस उरलेत. याबाबत त्यांने ट्विटरवर म्हटलंय, 'पीके' को 'आना'.

आमिर असे बिलकूल म्हणार नाही, पिऊन या. मात्र, त्याच्या ट्विटवरून तसा अर्थ निघत आहे. १९ डिसेंबरला 'पीके' सिनेमा रिलीज होत आहे. या सिनेमाचे प्रदर्शनापूर्वीच कौतुक झाले आहे. या सिनेमात अनुष्का शर्मा , सुशांत सिंह राजपूत, सौरव शुक्ला आणि संजय दत्त आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.