हवाई : विमानात योगासन करणाऱ्या प्रवाशाला ४३ हजार ६०० डॉलर्सचा दंड करण्यात आला आहे. यानंतर महिन्याभराने हयॉंगटाई पाई या प्रवाशाला आपल्या मायदेशात दक्षिण कोरियामध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली. पाईला अमेरिकन हवाई कंपनीला ४३ हजार ६०० डॉलर्सची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. .
पाई आणि त्याची पत्नी लग्नाचा चाळीसावा वाढदिवस साजरा करण्यासाठी हवाई येथे आले होते. हवाईवरुन ते विमानाने मायदेशी परतत असताना पाईला अटक करण्यात आली.
होनोलुलु ते टोक्यो प्रवासा दरम्यान पाईला त्याच्या आसनावर बसायचे नव्हते. तो योगा करण्यासाठी विमानाच्या मागे गेला. त्यावेळी विमानातील क्रू ने त्याला त्याच्या जागेवर जाऊन बसण्याची विनंती केली. पण पाई आपल्या जागेवर परतण्यास तयार नव्हता.
त्याने क्रू मेंबर्स आणि अन्य प्रवाशांना धमकावले. विमानातील या गोंधळामुळे वैमानिकाने विमान पुन्हा होनालुलुच्या विमानतळावर वळवले. तेथे त्याला तपास अधिकाऱ्यांनी अटक केली. अमेरिकन न्यायालयाचे न्यायाधीश केवीन चांग यांनी त्याची बॉण्डवर सुटका केली पण त्याला हवाई सोडून जाण्यास मनाई केली होती.