टोकियो : जगातील सर्वात वृद्ध पुरूष अशी ख्याती असणाऱ्या यात्सुरो कोईडे यांचा मंगळवारी मृत्यू झाला. ते ११२ वर्षांचे होते.
राईट बंधुंनी आकाशात पहिल्यांदा विमान उडवण्यापूर्वीच्या काळात यात्सुरो कोईडे यांचा जन्म झाला होता. नागोया येथील रूग्णालयात हदय बंद पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
गेल्या काही वर्षांपासून ते रुग्णालयातच असल्याची माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली. वायव्य टोकियोमध्ये राहणाऱ्या यात्सुरो यांचा जन्म १३ मार्च १९०३ रोजी झाला होता.
१) २०ऑगस्ट २०१५ रोजी गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांना जगातील सर्वात वयोवृद्ध पुरुषाचा मान देऊन सन्मानित करण्यात आले होते. ते ११२ वर्ष आणि १६१ दिवसांचे झाले होते.
२) ते फुकूई येथी त्सुरूगा येथे एका कापड दुकानात शिंप्याचे काम करत होते.
३) ते वयाच्या १०७ वर्षी जपानमधील नागोया आयची येथे आपल्या मुलीच्या घरी राहायला गेले.
४) ते दररोज डे केअर सेंटरला भेट देऊन आपली आरोग्य तपासणी करत होते.
५) घरात ते चालत होते इतर वेळी ते व्हिलचेअर वापरत होते.
६) त्याचे दात अजूनही मजबूत होते. त्यांनी कधी कवळीचा आधार घेतला नाही.
७) चष्म्याशिवाय ते वर्तमानपत्र वाचत होते.
८) ते सिगारेट पित नव्हते किंवा दारूही पित नव्हते. त्याचे आवडते अन्न ब्रेड होते.
९) ते ताणतणावापासून दूर राहत होते.
१०) मध्यंतरी यात्सुरो यांना त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य विचारण्यात आले असता त्यांनी अतिश्रम टाळा आणि आनंदाने जगा असा सल्ला दिला होता.