लंडन : गर्भनिरोधक अॅप असू शकतं याची कल्पना अनेकांनी केली नसेल, पण हे शक्य आहे, हे अॅप सध्या प्रचंड चर्चेत आहे. विशेष म्हणजे ब्रिटिश सरकारने त्यांच्या देशात या अॅपला मान्यता देखीव दिली आहे. गर्भनिरोधक गोळ्यांवर पर्याय म्हणून या अॅपकडे पाहण्यात येत आहे.
ब्रिटन सरकारच्या 'मेडिसिन अॅन्ड हेल्थकेअर प्रोडक्ट्स रेग्युलेटरी अॅजेन्सी'ने या अॅपला परवानगी दिली आहे. या अॅपल 'नॅचरल सायकल' असं नाव देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हे अॅप पारंपरिक गर्भनिरोधकांपेक्षाही ९९ टक्के उत्तम कार्य करतं.
संबंधित महिलेला रोज सकाळी जीभेच्या खालील तापमान नोंदावं लागेल, या तापमानाची अचूक नोंद अॅपमध्ये करा, या नुसार हे अॅप गर्भवती राहण्याची किती शक्यता आहे, हे सांगेल.
ज्या दिवशी अॅप हिरवा रंग दाखवेल, त्या दिवशी सेक्स केल्यास गर्भवती राहण्याची शक्यता फारच कमी असेल. पण ज्या दिवशी लाल रंग दाखवेल, त्या दिवशी गर्भवती राहण्याची शक्यता फार जास्त असेल, या दिवशी सुरक्षापूर्वक सेक्स करावा, अशी सूचना या महिलेला असेल.
सध्या हे अॅप १६१ देशातील १ लाख ५० हजार स्त्रिया वापरत आहेत. हे अॅप नोबेल पुरस्कार विजेते वैज्ञानिक डॉक्टर राउल शेरवित्ज आणि त्यांची पत्नी एलिना बेर्गलुंड यांनी डेव्हलप केलं आहे. हिग्स बोसॉन पार्टिकलाचा शोध घेण्याबद्दल २०१३ मध्ये या दाम्पत्याला नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.