बुरख्यात कॅमेरा लपून दोन महिलांनी ‎ISIS राजधानीचा खरा चेहरा आणला जगासमोर!

जिवाची पर्वा न करता दोन बुरखाधारी महिलांनी कॅमेरा लपवून इसिसच्या राजधानीची खरे रुप जगासमोर आणले.

Updated: Mar 16, 2016, 06:50 PM IST
बुरख्यात कॅमेरा लपून दोन महिलांनी ‎ISIS राजधानीचा खरा चेहरा आणला जगासमोर! title=

रक्का : सीरियामध्ये ISIS‬ दहशतवाद्याच्या ताब्यात रक्का हे शहर आहे. मात्र, जिवाची पर्वा न करता दोन बुरखाधारी महिलांनी कॅमेरा लपवून इसिसच्या राजधानीची खरे रुप जगासमोर आणले.

दोन महिलांना आपलाय जीव धोक्यात घालून ‪#‎ISIS‬ चा खरा चेहरा जगापुढे आणलाय. इसिसचे दहशतवादी गण घेऊन प्रत्येकाची चाचपणी करताना दिसत आहेत. हे दहशतवादी लोकांना अमानुषपणे मारतात आणि त्यांची हत्या करतात.

‪#‎ISIS‬चे अतिरेकी लोकांना ओलीस धरतात. त्यांना काळे कपडे घालून बसवून ठेवतात. नंतर त्यांच्यावर गोळ्या झाडतात. गोळीबारानंतर त्यांचे मुंडके छाटले जाते. हे मुंडके रस्त्याच्या बाजुला खुंटीला लटकविले जाते. तसेच महिलांना बुरखा घालूनच वावरावे लागते. महिलांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जात असल्याचे यातील एका महिलेने सांगितले.