कवटीत चाकू आणि 'ती' स्वत: चालत रुग्णालयात

चीनचं शहर चांगचुनच्या एका हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि नर्स एक दृश्य पाहून स्तब्ध राहिले. कारण चक्क डोक्यात चाकू घुसला असतांनाही एक महिला स्वत: हॉस्पिटलमध्ये आली. 

Updated: Jul 16, 2014, 06:44 PM IST
कवटीत चाकू आणि 'ती' स्वत: चालत रुग्णालयात title=

चांगचुन (चीन) : चीनचं शहर चांगचुनच्या एका हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि नर्स एक दृश्य पाहून स्तब्ध राहिले. कारण चक्क डोक्यात चाकू घुसला असतांनाही एक महिला स्वत: हॉस्पिटलमध्ये आली. 

५७ वर्षीय महिला लियू यान्याच्या मुलीनं सांगितलं की, तिची आई पडली आणि तिच्या डोक्यात चाकू ११ सेंटीमीटर आत घुसला. तो धारदार भाग तिच्या डोक्यात खूप आत गेला. ही बातमी इंग्लंडचं वृत्तपत्र मेट्रोनं दिलीय. त्या महिलेची मुलगी वांग शूनं सांगितलं की, तिनं खूप जोरात काही तरी पडल्याचा आवाज ऐकला. ती बाहेर आली बघते तर काय तिची आई पायऱ्यांवर बसून होती आणि तिच्या डोक्यात चाकू घुसलेला होता. 

आश्चर्याची बाब म्हणजे इतकी खोल जखम झाली असतांनाही यान्या बोलत होती आणि पायी पायी चालतही होती. हॉस्पिटलचे चीफ सर्जन सन यांग यांनी सांगितलं की, जेव्हा आमच्यासमोर रुग्ण  ही महिला आली तेव्हा ती बोलत होती आणि स्वत:च चालत आली. सन यांग यांनी ऑपरेशन करून तो चाकू तिच्या डोक्यातून काढला. मात्र यान्याची काळजी काही मिटली नाही. कारण या ऑपरेशनचं बिल खूप भरमसाठ आहे ते तिला फेडायचंय. कदाचित त्यासाठी तिला तिचं घरही विकावं लागणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.