www.24tass.com , झी मीडिया ,वृत्तसंस्था .
इंडोनेशियाच्या माउंट सिनाबंग भागात ज्वालामुखीच्या उद्रेकात १६ जणांचा मृत्यु झाला. ज्वालामुखी शांत झाल्यामुळे इंडोनेशियाच्या नागरिकांना तेथील स्थानिक अधिकाऱ्याने माउंट सिनाबंग भागात परतण्याची परवानगी दिली होती. शनिवारी माउंट सिनाबंग भागात ज्वालामुखीचा उद्रेक झाला, आणि अनर्थ घडला .
नॅशनल डिझास्टर मिटिगेशनचे प्रवक्ते सुतोपो पूर्वो नग्रोहो यांनी दिलेल्या माहितीनुसार ३ जणांना वाचवण्यात यश आले. तसेच १४ मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. मृतदेहांपैकी दोन मृतदेह महाविद्यालयीन तरूणांचे होते.
उद्रेकामध्ये तप्त लाव्हा, राख, धुराचे लोट, विषारी वायु वातावरणात पसरल्यामुळे स्थानिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. चार महिने परिस्थीतीत सुधारणा होणार नसल्याचे तज्ज्ञाकडून समजते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.