VIDEO : रस्त्यावर बाचाबाची... आणि मग अंगाचा थरकाप उडवणारी घटना!

रस्त्यावर चुकून घडलेला एक छोटासा अपघात एखाद्याला इतक्या क्रूर कृत्यापर्यंत नेऊ शकतो, असा तुम्ही कधी विचारही केला नसेल. 

Updated: Jun 29, 2016, 06:08 PM IST
VIDEO : रस्त्यावर बाचाबाची... आणि मग अंगाचा थरकाप उडवणारी घटना! title=

हाँगकाँग : रस्त्यावर चुकून घडलेला एक छोटासा अपघात एखाद्याला इतक्या क्रूर कृत्यापर्यंत नेऊ शकतो, असा तुम्ही कधी विचारही केला नसेल. 

पण, असं घडलंय... हाँगकाँगमध्ये ही घटना घडलीय... आणि या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल झालाय. 

व्हि़डिओत एक सफेद रंगाची गाडी आणि निळ्या गाडीत एक छोटासा अपघात झालेला दिसतोय. त्यानंतर सफेद रंगाच्या गाडीच्या ड्रायव्हरला आपला राग एव्हढा अनावर झाला की निळ्या रंगाच्या गाडीत बसलेल्या तिघांच्या अंगावर त्यानं गाडी चढवण्याचा प्रयत्न केला. 

यापैंकी दोघांना तर त्यानं आपल्या गाडीच्या खाली चिरडण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नात असताना या गाडीनं आणखी एका गाडीला ठोकलं... आणि मग काय घडलं ते तुम्ही या व्हिडिओत पाहू शकाल...