यूएफओचा पाठलाग करताना लढाऊ विमानाचा व्हिडीओ

 बुल्गारिया येथील आकाशात यूएफओ दिसल्याची घटना समोर आलीये. व्हिडीओमध्ये लष्कराचे लढाऊ विमान या यूएफओचा पाठलाग करताना दिसतंय. बुल्गारियन पॅरानॉर्मल वेबसाइट 'पोर्टल 12' ने याबाबततचे फोटो प्रकाशित केलेत. 

Updated: Jan 24, 2016, 09:02 AM IST
यूएफओचा पाठलाग करताना लढाऊ विमानाचा व्हिडीओ title=

लंडन :  बुल्गारिया येथील आकाशात यूएफओ दिसल्याची घटना समोर आलीये. व्हिडीओमध्ये लष्कराचे लढाऊ विमान या यूएफओचा पाठलाग करताना दिसतंय. बुल्गारियन पॅरानॉर्मल वेबसाइट 'पोर्टल 12' ने याबाबततचे फोटो प्रकाशित केलेत. 

नोवा जागोराच्या आकाशात लढाऊ विमान यूएफओचा पाठलाग करताना दिसले. एका रीडरने हे अद्भुत फुटेज तसेच फोटोज काढले. 

रिपोर्टनुसार, प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार यूएफओ साधारण पाच मिनिटांपर्यंत आकाशात दिसत होते. यावेळी लढाऊ विमानही त्याचा पाठलाग करत होते. वेबसाइट यूफओ सायटिंग्स डेलीचे संपादक स्कॉट सी वेरिंग यांनी ही घटना समोर आणलीये.