नासाचा शास्त्रज्ञ अंतराळात खेळला टेबल टेनिस. नासानं केला व्हिडिओ शेअर

टेबल टेनिस खेळताना तुमचा सामना असतो तो वेगाशी. पण अंतराळामध्ये कोणी टेबल टेनिस खेळलं तर.... 

Updated: Jan 23, 2016, 07:22 PM IST
 नासाचा शास्त्रज्ञ अंतराळात खेळला टेबल टेनिस. नासानं केला व्हिडिओ शेअर title=

वॉशिंग्टन : टेबल टेनिस खेळताना तुमचा सामना असतो तो वेगाशी. पण अंतराळामध्ये कोणी टेबल टेनिस खेळलं तर.... 
नासाचे शास्त्रज्ञ स्कॉट केली यांनी अंतराळावर टेबल टेनिस खेळलंय. तेही पाण्याच्या बॉलनं. स्कॉट यांचा हा व्हिडिओ नासानं शेअर केला आहे. अंतराळामध्ये गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे टेबल टेनिसचा आत्तापर्यंतचा हा कदाचित सगळ्यात स्लो गेम असेल. 
टेबल टेनिस खेळताना स्कॉट यांनी चक्क पाण्याचा बॉल वापरला. तर लाकडाच्या बॅट ऐवजी हायड्रोफोबिक पॉलीकाब्रोनेटची बॅट वापरलीये. अंतराळामध्ये जाऊन स्कॉट यांना आता 300 पेक्षा जास्त दिवस झालेत.

पाहा स्कॉट केली यांचा अंतराळातला हा व्हि़डिओ