इस्लामाबाद : पाकिस्तानी अभिनेत्री आणि बिग बॉस फेम वीणा मलिकला कोर्टाने २६ वर्ष तुरूंगावास सुनावला आहे. वीणाला १३ लाखांचा दंडही ठोठावलाय. ईशनिंदा म्हणजे अल्लाहवर टीका केल्याचा आरोप वीणा मलिकवर आहे.
यात वीणासह तिचा पती बशीर, पाकिस्तानच्या जिओ टीव्हीचे मालक शकील उर रहमान आणि टीव्ही अँकर यांनाही २६ वर्षांचा तुरुंगवास आणि १३ लाखांचा दंडाची शिक्षा देण्यात आली आहे.
ईशनिंदाचं प्रकरण समोर आलं आणि कोर्टाने त्यांना ही शिक्षा सुनावली. टीव्ही शोमध्ये अभिनेत्री वीणा आणि तिचा पती बशीरच्या 'नकली निकाह' मध्ये धार्मिक गाणं लावण्यात आलं होतं.
न्यायाधीश शाहबाज खान यांनी वीणा मलिक आणि बशीरसह टीव्ही शोची अँकर शाइस्ता वाहिदीला २६ वर्षांच्या तुरुंगावसाची शिक्षा सुनावली आहे. यात जे आरोपी दंडाची १३लाखांची रक्कम जमा करु शकत नाही, त्यांची संपत्ती विकावी, असं न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.