'भारतात तयार झालेली मॅगी खाण्यासाठी सुरक्षित'

ब्रिटनची खाद्य नियामक एजन्सी म्हणजेच 'एफएसए'नं भारतात तयार करून आयात केलेल्या नेस्ले कंपनीच्या मॅगीला हिरवा कंदिल दिलाय. ही मॅगी सुरक्षित असल्याचा निर्वाळा एफएसएनं दिलाय. 

Updated: Jul 2, 2015, 10:43 AM IST
'भारतात तयार झालेली मॅगी खाण्यासाठी सुरक्षित' title=

लंडन : ब्रिटनची खाद्य नियामक एजन्सी म्हणजेच 'एफएसए'नं भारतात तयार करून आयात केलेल्या नेस्ले कंपनीच्या मॅगीला हिरवा कंदिल दिलाय. ही मॅगी सुरक्षित असल्याचा निर्वाळा एफएसएनं दिलाय. 

भारतातून आयात करण्यात आलेल्या 'मॅगी'मध्ये शीशाचं प्रमाण ब्रिटन आणि युरोपीयन संघाद्वारे निश्चित केलेल्या सीमेच्या आतच आढळलंय. 

'एफएसए'च्या म्हणण्यानुसार, ब्रिटनमध्ये मॅगी नुडल्सच्या परीक्षण नमुन्यांतून मिळालेल्या परिणामांत या उत्पादनात शीशाचं प्रमाण युरोपीय संघाच्या मान्यतेप्रमाणे योग्य प्रमाणात आहे आणि उपभोक्त्यांनी ही मॅगी खाताना कोणतीही चिंता करण्याचं कारण नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.