ब्रिटनमध्ये दोन खेळाडूंनी जिंकली ६.४ अरब रुपयांची लॉटरी

ब्रिटनमधील सर्वात मोठ्या राष्ट्रीय लॉटरीमध्ये दोन नागरिकांनी तब्बल ६.६ कोटी पाउंडचे (६.४ अरब रुपये) लॉटरीचे बक्षीस जिंकलेय. या दोन्ही खेळाडूंना ही रक्कम वाटून दिली जाणार आहे. 

Updated: Jan 10, 2016, 12:09 PM IST
ब्रिटनमध्ये दोन खेळाडूंनी जिंकली ६.४ अरब रुपयांची लॉटरी title=

लंडन : ब्रिटनमधील सर्वात मोठ्या राष्ट्रीय लॉटरीमध्ये दोन नागरिकांनी तब्बल ६.६ कोटी पाउंडचे (६.४ अरब रुपये) लॉटरीचे बक्षीस जिंकलेय. या दोन्ही खेळाडूंना ही रक्कम वाटून दिली जाणार आहे. 

अनेक नागरिकांनी या लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. २० वर्षापूर्वी खेळण्यात आलेल्या लॉटरीमध्ये ब्रिटनमधील एका विजेत्याला २२.६ कोटी पाउंडचे बक्षीस मिळाले होते. 

१९९४ मध्ये ब्रिटनमध्ये राष्ट्रीय लॉटरीची सुरुवात करण्यात आली. आठवड्यातून दोन वेळा लॉटरी खेळली जाते.