अमेरिका अध्यक्षपद निवडणुकीत दहशतवादी हल्ल्याची शक्यता

अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या काळात अल कायदा या दहशतवादी संघटनेनं हल्ल्याचा कट रचल्याच इशारा अमेरिकन गुप्तचर यंत्रणेनं दिला आहे.

Updated: Nov 5, 2016, 08:01 AM IST
अमेरिका अध्यक्षपद निवडणुकीत दहशतवादी हल्ल्याची शक्यता title=

वॉशिंग्टन : अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या काळात अल कायदा या दहशतवादी संघटनेनं हल्ल्याचा कट रचल्याच इशारा अमेरिकन गुप्तचर यंत्रणेनं दिला आहे.

मंगळवार 8 नोव्हेंबरला अमेरिकेत अध्यक्षपदासाठी मतदान होतंय या पार्श्वभूमीवर देशभरातील पोलीस यंत्रणा सतर्क झाल्यात. डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांच्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे. 

राजकीय वातावरण तापत असतानाच दहशतवादी संघटनांनी याच कालावधीत हल्ला घडवण्याचा कट रचल्याची माहिती समोर आल्यानं अमेरिकेत सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलीये. या धर्तीवर एफबीआय, गुप्तचर यंत्रणांसोबत संयुक्त दहशतवादविरोधा पथकही स्थापन करण्यात आले आहे.