पाकिस्तानात पोलीस ट्रेनिंग सेंटरवर दहशतवादी हल्ला, 44 पोलीस ठार

पाकिस्तानमधील क्वेटा येथील पोलीस ट्रेनिंग सेंटरवर दहशतवाद्यांनी हल्ला घडवून आणला. या हल्ल्यात 44 पोलीस ठार झालेत.  

Reuters | Updated: Oct 25, 2016, 07:37 AM IST
पाकिस्तानात पोलीस ट्रेनिंग सेंटरवर दहशतवादी हल्ला, 44 पोलीस ठार title=

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील क्वेटा येथील पोलीस ट्रेनिंग सेंटरवर दहशतवाद्यांनी हल्ला घडवून आणला. या हल्ल्यात 44 पोलीस ठार झालेत. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. यावेळी 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

सारयाब रोडवरील पोलीस ट्रेनिंग सेंटरवर पाच ते सहा दहशतवादी रात्री गोळीबार करत या सेंटरमध्ये घुसले. दरम्यान, यावेळी दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देत पोलिसांनीही गोळीबार केला. 

सेंटरमधील होस्टेलमध्ये असलेल्या प्रशिक्षणार्थी पोलिसांना काही दहशतवाद्यांनी ओलीस ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. सेंटरमध्ये 500 हून अधिक प्रशिक्षणार्थी पोलीस आहेत. आत्तापर्यंत 200 पोलिसांची सुखरुप सुटका करण्यात आली. मात्र, सर्च ऑपरेशन सुरु आहे. 
  
दरम्यान, या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिसांना क्वेटा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर तहरिक-ए-इन्साफचे प्रमुख आणि माजी क्रिकेपटू इम्रान खान याने ट्विट करत या हल्ल्याचा निषेध केला.