तांत्रिक बिघाडानं न्यूयॉर्कला चार तास लटकावलं!

टेक्नॉलोजीच्या बाबतीत जगातल्या सगळ्या प्रगत शहरांपैकी एक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या न्यूयॉर्कला काल तांत्रिक बिघाडाचा मोठा फटका बसला. 

Updated: Jul 9, 2015, 01:23 PM IST
तांत्रिक बिघाडानं न्यूयॉर्कला चार तास लटकावलं! title=

न्यूयॉर्क : टेक्नॉलोजीच्या बाबतीत जगातल्या सगळ्या प्रगत शहरांपैकी एक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या न्यूयॉर्कला काल तांत्रिक बिघाडाचा मोठा फटका बसला. 

न्यूयॉर्क स्टॉक एक्स्जेंजवर स्थनिक वेळेनुसार ११ वाजून ३२ मिनिटांनी एका छोट्या कंपनीच्या शेअर्सचा भाव दाखवण्याच्या यंत्रात बिघाड झाला. त्यानंतर काही मिनिटातच संपूर्ण न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज ठप्प झालं. तांत्रिक बिघाड झाल्यानं तब्बल चार तास स्टॉक एक्सचेंज बंद होतं. 

इकडे एक्सचेंज बंद पडलेलं असताना तिकडे न्यूयॉर्कमधूनच साऱ्या अमेरिकेत विमानसेवा पुरवणारी युनायटे़ड एअरलाईन ही विमानसेवाही तांत्रिक बिघाड झाला.

दरम्यान, हा सायबर हल्ला तर नाही ना? याची चौकशी एफबीआयनं सुरु केलीय. चौकशीनंतर हल्ल्याच्या शंकेचं निरसन झालं आणि दोन्ही ठिकाणी तांत्रिक बिघाड झाल्याचं उघड झालं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.