www.24taas.com,नवी दिल्ली
दक्षिण सुदानमध्ये मंगळवारी भारतीय शांती सैनिकावर हल्ला करण्यात आला होता. यात पाच भारतीय सैनिक शहीद झालेत. या पाचही शांती सैनिकाचे मृतदेह आज सकाळी भारतात आणण्यात आलेत.
दक्षिण सुदानमध्ये संयुक्त राष्ट्र संघासोबत भारतीय शांती सैनिक काम करत होते. एका हल्ल्यामध्ये पाच सैनिकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले होते. याबाबचे वृत्त पीटीआयने दिले होते.
दक्षिण सुदानमध्ये भारताच्या शांती सैनिकांवर हल्ला चढविण्यात आला. या हल्ल्यात चार सैनिक जखमी झाले होते. त्यांनाही संयुक्त राष्ट्राच्या चार्टर्ड विमानाने आज सकाळी भारतात आणले.
हल्ल्यातील मृत सैनिकांमध्ये लेफ्टनंट कर्नल महिपाल सिंग, नायब सुबेदार शिवकुमार पाल, हवालदार हीरालाल, हवालदार भरत सिंग आणि शिपाई नंदकिशोर यांचा समावेश आहे. हे जवान सहा बटालियन मेहर रेजीमेंट आणि नऊ बटालिनचे सदस्य होते.