पेशावर : पाकिस्तान आर्मीने दिलेल्या माहितीनुसार चार दहशतवादी ठार झाले आहेत, विद्यापिठ आता संपूर्णपणे आर्मीच्या नियंत्रणात आहे. या हल्ल्यात आतापर्यंत किती लोक मारले गेले आहेत, किंवा जखमी झाले आहेत याची माहिती मिळालेली नाही.
मात्र पाकिस्तान मीडिया आणि विद्यापिठाच्या कुलगुरूंनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. यात चार गार्डस, दोन विद्यार्थी, आणि प्राध्यापकाचा समावेश आहे.
पीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानातील बाचा विद्यापिठातील होस्टेलमध्ये सकाळी नऊ वाजता, चार ते पाच दहशतवादी घुसले, हे विद्यापीठ पेशावर पासून ५० किलोमीटर दूर आहे.
तहरिक ए पाकिस्तानने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली
चार सद्दा बाचा खान विद्यापिठात दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे, सुरूवातीला दोन स्फोटांचे आवाज ऐकण्यात आले आहेत, या विद्यापिठात एकूण ३ हजार विद्यार्थी आहेत.
काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ८० मुलांना दहशतवाद्यांनी डोक्यात गोळ्या घातल्या असल्याची माहिती आहे, मात्र या बाबतीत अजून अधिकृत माहिती मिळालेली नाही.
विद्यापिठाच्या आत फायरिंग देखील सुरू असल्याची माहिती आहे, यात काही जण जखमी झाल्याची माहिती आहे. विद्यापिठात एकूण ३ दहशतवादी घुसल्याची प्राथमिक माहिती आहे, विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे.
गोळीबारात पाच ते सहा जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे, विद्यापिठात मागील २ तासांपासून गोळीबाराचे आवाज येत आहेत.