स्वीडनमध्ये भारतीय दूतावासाजवळ अतिरेकी हल्ला

 स्वीडनची राजधानी स्टॉकहोममध्ये अतिरेकी हल्ला झाला आहे. एका डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये मोठा बिअर ट्रक घुसवण्यात आला आहे. यामध्ये किमान दोघांचा बळी गेला आहे. हा अतिरेकी हल्लाच असल्याचं स्वीडिश पंतप्रधान स्टीफन लोवेन यांनी स्पष्ट केलं आहे.

Updated: Apr 7, 2017, 09:59 PM IST
स्वीडनमध्ये भारतीय दूतावासाजवळ अतिरेकी हल्ला title=

स्टॉकहोम : स्वीडनची राजधानी स्टॉकहोममध्ये अतिरेकी हल्ला झाला आहे. एका डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये मोठा बिअर ट्रक घुसवण्यात आला आहे. यामध्ये किमान दोघांचा बळी गेला आहे. हा अतिरेकी हल्लाच असल्याचं स्वीडिश पंतप्रधान स्टीफन लोवेन यांनी स्पष्ट केलं आहे.

भारतीय दूतावासापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर ही घटना घडली आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आल्याची माहिती मिळतेय. स्थानिक वाहिन्यांनी या हल्ल्यात किमान 5 जण ठार झाल्याचा दावा केला असला, तरी त्याला अधिकृत पुष्टी मिळू शकली नाही. मात्र हल्ल्यामध्ये जखमींची संख्या मोठी असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी मान्य केलं आहे.