VIDEO : अंगाचा थरकाप उडवणारा हा व्हिडिओ पाहाच...

खराब हवामानामुळे एखादं अवाढव्य विमान हवेत हेलकावे खाताना कधी तुम्ही पाहिलंत का? नसेल... तर हा व्हिडिओ नक्की पाहा...  

Updated: Oct 4, 2016, 08:30 PM IST
VIDEO : अंगाचा थरकाप उडवणारा हा व्हिडिओ पाहाच...  title=

मुंबई : खराब हवामानामुळे एखादं अवाढव्य विमान हवेत हेलकावे खाताना कधी तुम्ही पाहिलंत का? नसेल... तर हा व्हिडिओ नक्की पाहा...  

'flugsnug' नावाच्या यू ट्यूब अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. 'एअरबस ए321' विमान बर्मिंगहॅम विमानतळावर लँडिंग करत असताना हा व्हिडिओ शूट करण्यात आलाय. 

खराब हवामान आणि जोरात सुटलेल्या वाऱ्यानं विमानाच्या पायलटला चांगलंच बेजार केलं. या व्हिडिओला यूट्यूबवर आत्तापर्यंत 934,089 व्ह्यूज मिळालेत.