पाकला मदत करणाऱ्या चीनी अर्थव्यवस्थेला असा द्या दणका...

भारत - पाकिस्तान संबंध ताणले गेल्यानंतर चर्चेला उधाण आलंय. पाकिस्तान आणि दहशतवाद हे दोन वेगवेगळे शब्द न राहता त्याचा एकच अर्थ गृहीत धरण्यात येतोय. साहजिकच, विषय भारताच्या सुरक्षेचा असेल तर पाकिस्तानसोबतच चीनचाही उल्लेख वारंवार होतोय. 

Updated: Oct 4, 2016, 07:58 PM IST
पाकला मदत करणाऱ्या चीनी अर्थव्यवस्थेला असा द्या दणका...  title=

मुंबई : भारत - पाकिस्तान संबंध ताणले गेल्यानंतर चर्चेला उधाण आलंय. पाकिस्तान आणि दहशतवाद हे दोन वेगवेगळे शब्द न राहता त्याचा एकच अर्थ गृहीत धरण्यात येतोय. साहजिकच, विषय भारताच्या सुरक्षेचा असेल तर पाकिस्तानसोबतच चीनचाही उल्लेख वारंवार होतोय. 

पाकिस्तानला मदत करत असतानाच सोबतच दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी चीनलाही जबाबदार धरण्यात येतंय. चीनच्या मजबूत अर्थव्यवस्थेचा आणि बाजाराचा परिणाम वारंवार भारतीय अर्थव्यवस्थेवर दिसून येतोय... हाही मुद्दा गौण नाही.

त्यामुळेच, पाकिस्तानला मदत करणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था ढासळवण्यासाठी आपण आपल्यापरीनं काय करू शकतो... याबद्दल व्हॉटसअप आणि सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. अशीच अत्यंत वेगात शेअर होणारी ही माहिती... 

चीनची अर्थव्यवस्थेला दणका देण्यासाठी भारतीय चीनच्या स्वस्त वस्तूंच्या वापरावर बहिष्कार टाकू शकतात. यासाठी अगोदर तुम्हाला 'मेड इन चायना' वस्तू कोणत्या आहेत त्या ओळखता यायला हव्यात. बार कोडद्वारे तुम्ही या वस्तू ओळखू शकता.

कसे ओळखाल बारकोड...

वस्तूंच्या बारकोडमध्ये सुरुवातीचे 3 अंक  - 690, 691 किंवा 692 असतील तर त्या वस्तू 'मेड इन चायना' आहेत.

बारकोडमध्ये पहिले 3 अंक - 471 असतील तर ती वस्तू तैवानमध्ये बनलीय.

आणि जर वस्तूंच्या बारकोडमधली पहिली 3 अंक 890 असतील तर ही वस्तू भारतात बनलीय, असं समजा.