वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी भारतीय वंशाची अमेरिकन राजनेता स्वाती दांडेकर यांची आशियाई विकास बँकेच्या ( एडीबी) कार्यकारी संचालकपदी नेमणूक केलीय.
स्वाती दांडेकर या रॉबर्ट एम आर यांची जागा घेणार आहेत. एडीबीच्या कार्यकारी संचालकपदाचा दर्जा राजदूत बरोबरचा असतो.
स्वाती या भारतीय वंशाच्या पहिल्या अमेरिकन नागरिक आहेत ज्या राज्या प्रतिनिधी सभेच्या सदस्या बनल्या होत्या. बराक ओबामा यांनी इतर प्रशासकीय नियुक्त्यांसोबत अमेरिकेच्या आशियाई विकास बँकेच्या सर्वोच्च पदासाठी स्वाती यांच्या नावाची घोषणा केलीय.
स्वाती आइयोवा २००३ पासून २००९ पर्यंत राज्य प्रतिनिधी सदस्य राहिल्या तर २००९ पासून २०११ पर्यंत राज्या सीनेटच्या सदस्या राहिल्या. त्या १९७३ साली त्यांचे पती अरविंद दांडेकर यांच्यासोबत अमेरिकेला स्थायिक झाल्या होत्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.