www.24taas.com, नवी दिल्ली
भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आपल्या दोन सहकाऱ्यांसह सुमारे चार महिन्यांनंतर आज सोमवारी सकाळी ७.२९ मिनिटांने अंतराळातून पृथ्वीवर सुखरूप परतली.
कझाकिस्तानमधील अंतराळ स्थानकावर अंतराळवीर उतरले. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाची जबाबदारी नासाचे अंतराळवीर केव्हिन फोर्डने यांच्याक़डे सोपवत सुनीता विल्यम्सने पृथ्वीवर पाऊल ठेवले. आम्ही या यानाची जबाबदारी योग्य हातात देऊन पुन्हा घराकडे परतत आहोत, असे सुनीताने सांगितले.
भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स हिने प्रकाशाचा उत्सव दिवाळीनिमित्ताने भारतीयांना शुभेच्छा दिल्या होत्या.
२००६मध्येही सुनीता विल्यम्स सहा महिने राहिले अवकाशात राहीली होती. तिची दुसऱ्यांदा अंतराळ मोहीम आहे. सुनीता ही सध्या अमेरिकी नागरिक आहे. सुनीताने अवकाश स्थानकातून अमेरिका अध्यक्ष निवडणुकीसाठी मतदान केले होते. अंतराळातून मतदान करणारी सुनीता ही पहिली महिला ठरली आहे.