www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भारताची सागरी सीमा पार केल्याने श्रीलंकेच्या नौदलाकडून २२ भारतीय मच्छीमारांना आज अटक करण्यात आली. हे सर्व मच्छीमार तमिळनाडूतील पुडुकोट्टी जिल्ह्यातील जगडापट्टीनम या गावातील आहेत.
कांगेसथुराई बंदराजवळ मच्छीमार करताना यांना अटक करण्यात आली. त्यांच्या सहा बोटी जप्त करण्यात आल्या आहेत. श्रीलंकेने आतापर्यंत २२० भारतीय मच्छीमारांना अटक केलेली आहे. त्यांची अद्याप सुटका झाली नसताना आणखी २२ जणांना अटक करण्यात आली आहे.
श्रीलंका नौदलाच्या जवानांनी या भागात मच्छीमारी करत असलेल्या आणखी काही बोटींचा पाठलाग केला. मात्र त्या बोटी भारतीय हद्दीत आल्याने ते काही करू शकले नाहीत. गेल्या काही महिन्यांत श्रीलंकेकडून अटक करण्यात आलेल्या भारतीय मच्छीमारांची सुटका करण्यात यावी. अशी मागणी भारतीय मच्छीमार संघटनेकडून करण्यात येत आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.