अबूधाबी : सौरऊर्जेवर चालणारं एक विमान आपल्या पहिल्या वहिल्या 'वर्ल्ड टूर'साठी सज्ज झालं. या विमानानं मंगळवारी अबूधाबीवरून उड्डाण घेत आपल्या प्रवासाला आरंभ केलाय.
विमान परिक्षणासाठी आज या विमानानं उड्डाण घेतलं. हे विमान अरब सागराला पार करून भारतात अहमदाबादमध्ये दाखल झालं... इथून ते म्यानमार, चीन, हवाई आणि न्यूयॉर्कलाही जाणार आहे. .
'सोलर इंपल्स'चे अध्यक्ष बटर्रन्ड पिकार्ड यांनी भावून होत या विमानाच्या उड्डाणावर प्रतिक्रिया दिलीय. 'अॅडव्हेन्चरला प्रारंभ झालाय' असं त्यांनी म्हटलंय.
पायलट आंद्रे बोशबर्ग यांनी अबुधाबीच्या अल-बातीन विमानतळावरून हे ऐतिहासिक उड्डाण भरलंय. हरित ऊर्जेला वाव देणं, हे या विमानाच्या अनोख्या उड्डाणाचं मुख्य लक्ष्य आहे.
ओमची राजधानी मस्कटपर्यंत ४०० किलोमीटर लांब उड्डाणात जवळपास १२ तासांचा वेळ लागण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.