टेक्सासमध्ये आंदोलकांचा पोलिसांवर गोळीबार, ४ जण ठार

अमेरिकेतील टेक्सासमध्ये आंदोलकांनी पोलिसांवर केलेल्या गोळीबारात 4 पोलिसांचा मृत्यू झालाय. तर अनेकजण जखमी झालेत.

Updated: Jul 8, 2016, 11:41 AM IST
टेक्सासमध्ये आंदोलकांचा पोलिसांवर गोळीबार, ४ जण ठार title=

टेक्सास : अमेरिकेतील टेक्सासमध्ये आंदोलकांनी पोलिसांवर केलेल्या गोळीबारात 4 पोलिसांचा मृत्यू झालाय. तर अनेकजण जखमी झालेत.

वर्णभेदावरून टेक्सासमधील डलासमध्ये पोलिसांच्या विरोधात हे आंदोलन सुरु होतं. या आंदोलनादरम्यान ही घटना घडलीये. याच आठवड्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पोलिसांनी एल्टन स्टर्लिंग आणि फइलांडो केस्टाइल नावाच्या दोन कृष्णवर्णीयांवर गोळीबार केला होता. 

पोलिसांनी केलेल्या गोळीबाराची दृश्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. पोलिसांच्या या अमानवीय कृत्याविरोधात डलासमध्ये आंदोलन सुरु होतं. या आंदोलनादरम्यान पोलिसांवर हा गोळीबार करण्यात आलाय.