बसमध्ये ८७ वर्षीय महिलेला २ मुलींकडून मारहाण

बसमध्ये दोन तरूणी आणि एका ८७ वर्षाच्या वृद्ध महिलेचं भांडण झालं, यात महिलेच्या तोंडावर मारहाण करण्यात आली आहे. या हल्ल्यानंतर या महिलेचा एक डोळा काळा पडला आहे, ही घटना दक्षिण लंडनमधील क्रॉयडॉनमध्ये रूट नंबर १६६ वर झाली. या मुली बसमध्ये विनातिकिट प्रवास करत होत्या.

Updated: Nov 10, 2015, 01:58 PM IST
बसमध्ये ८७ वर्षीय महिलेला २ मुलींकडून मारहाण title=

लंडन : बसमध्ये दोन तरूणी आणि एका ८७ वर्षाच्या वृद्ध महिलेचं भांडण झालं, यात महिलेच्या तोंडावर मारहाण करण्यात आली आहे. या हल्ल्यानंतर या महिलेचा एक डोळा काळा पडला आहे, ही घटना दक्षिण लंडनमधील क्रॉयडॉनमध्ये रूट नंबर १६६ वर झाली. या मुली बसमध्ये विनातिकिट प्रवास करत होत्या.

पोलिसांनी या घटनेचे लाजीरवाणे सीसीटीव्ही फुटेज जारी केले आहेत. यामुळे या दोन्ही तरूणींना पकडणे शक्य होणार आहे, ही घटना १६ ऑक्टोबरला शुक्रवारी दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी घडली. या मुलींचं वय १४ ते १८ दरम्यान असल्याचं सांगण्यात येत आहे.

महिला आणि कंडक्टरशी तिकिटावरून मुलींनी भांडण करणे सुरू केले, भांडणानंतर अनेक प्रवासी बसच्या खाली उतरले, एका महिलेने या वृद्ध महिलेला उपचारासाठी सेंट हेलियर हॉस्पिटल पोहोचवलं. या महिलेला आता डिस्चार्ज देण्यात आला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.