कॅलिफोर्निया : सध्या सेल्फीचं वेड कसं आणि किती पाहायला मिळेल, याचा काही नेम नाही. पण सॅन डियागोमध्ये सापासोबत सेल्फी काढणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलंय.
सापासोबत सेल्फी काढण्यासाठी टॉड फॅसलरनं एका झाडीत लपलेल्या सापाला बाहेर काढलं आणि त्याच्यासोबत सेल्फी काढू लागला. तेव्हा साप त्याला चावला आणि आता महिन्याभराच्या टॉड फॅसलरच्या उपचारांचा खर्च झालाय तब्बल 150,000 डॉलर म्हणजेच 96 लाख 23 हजार 115 रुपये.
पीडित म्हणाला, 'माझं संपूर्ण शरीर थरथरत होतं. सापानं चावल्यानंतर माझ्या शरीराला लकवा मारल्यासारखा झाला होता. माझी जीभ बाहेर आली होती आणि डोळे बंद होत होते.'
फॅसलरकडे एक पाळीव साप होता, या घटनेनंतर आता त्यानं तो सापही जंगलात सोडून दिलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.