www.24taas.com, झी मीडिया, मलेशिया
मलेशियाच्या गेल्या आठ मार्च रोजी बेपत्ता झालेल्या विमानाचा शोध अजुनही सुरूच आहे. रशियन विमानाने हिंदी महासागराच्या नवीन भागात विमानाचा शोध सुरू केला आहे. अनेक देशांना चौथ्या आठवडय़ानंतरही काहीच हाती लागलेले नाही.
मलेशियाच्या एमएच ३७- विमानाचा शोध दक्षिण हिंदूी महासागराच्या ईशान्येला ११०० किमी अंतरावर घेतला जात आहे. चीनच्या सागरी सुरक्षा प्रशासनाने हाक्सन ०१ हे जहाज व जिंगशान गे नौदलाचे जहाज दोन हेलिकॉप्टर्ससह पाठवले आहेत. तीन आठवडय़ांपूर्वी बेपत्ता झालेल्या विमानाचा शोध ते घेत आहेत.
चीनच्या विमानाला पांढऱ्या, लाल आणि नारिंगी रंगाचे तीन पदार्थ दिसले. शुक्रवारी पाच विमानांना वेगवेगळ्या रंगाच्या वस्तू दिसल्या होत्या, त्या वस्तू जहाजांनी परत आणल्याशिवाय त्यांची तपासणी करता येणार नाही, असे ऑस्ट्रेलियाच्या सागरी सुरक्षा प्राधिकरणाने म्हटले आहे.
शनिवारी आठ विमानांनी शोध घेतला त्यात दोन जपानचे एक न्यूझीलंडचे तर एक चीनचे इल्युशिन आयएल ७६ विमान होते.
मलेशियाचे वाहतूक मंत्री हिशामुद्दीन हुसेन यांनी सांगितले की, प्रवाशांचा शोध सुरूच राहील, कितीही लांब शोध घ्यावा लागला तरी हरकत नाही आम्ही तो घेऊ. त्यांनी प्रवाशांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. जे पदार्थ दिसले त्याबाबत नवीन माहिती नाही, असे त्यांनी सांगितले.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.