ब्रिटनमधील सर्वात हुश्शार विद्यार्थी भारतीय वंशाचा

BGR | Updated: Aug 23, 2014, 07:12 PM IST
ब्रिटनमधील सर्वात हुश्शार विद्यार्थी भारतीय वंशाचा title=

ब्रिटनः  ब्रिटनमध्ये 'बॅकअप अँड राँटेनस्टॉल ग्रामर' या शाळेत 18 वर्षीय भारतीय वंशाचा विद्यार्थी असानिष कल्यानसुंदरम यानं 12वी मध्ये पाच  कठीण विषयात 100 गुण मिळाले आहेत. यामुळं ब्रिटनमध्ये सगळे चकित झाले. हा विद्यार्थी ब्रिटनच्या लँकरशायर या शहरात राहतो.

असानिष कल्यानसुंदरम यानं गणित, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि क्रिटिकल थिकिंग या विषयात 100 पैकी शंभर गुण मिळवले आहेत. शाळेतील प्रवक्तानं दिलेल्या माहितीनुसार इतका प्रतिभावंत विद्यार्थी त्यांनी याआधी शाळेमध्ये कधीही पाहिला नव्हता. हा विद्यार्थी ब्रिटनमधील सगळ्यात प्रतिभाशाली विद्यार्थी आहे.

15 वर्षाचा असताना असानिषनं अॅडिशनल मॅथ्सच्या फ्री स्टॅडिंग मॅथ्स क्वालिफिकेशन (fsmo) आणि as या लेव्हलला पोहचला होता. सुरुवातीवासूनच असानिष हूशार मुलगा होता. असानिषला पुढील अभ्यास करण्यासाठी कॅम्ब्रिज विद्यापीठात प्रवेश घ्यायचाय.

असानिषला सप्टेंबरमध्ये सेंट जेम्स पॅलेसमध्ये 'ड्यूक ऑफ एडिनबगर्स गोल्ड अॅवॉर्ड'नं पुरस्कृत करण्यात आलंय. तसंच 'लॅकशायर कंट्री काउंसिल'नं गोल्ड अॅवॉर्ड विनर्ससाठी आयोजित रिसेप्शनमध्ये निमंत्रण दिलं आहे.  

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.