भेटा, 16 वर्षांच्या या ‘रिअल बार्बी’ला!

आजपर्यंत तुम्ही खेळण्यातली सुंदर ‘बार्बी डॉल’ बघितली असेल, पण युक्रेनमध्ये लोलिता रिची नावाची एक चालती-बोलती ‘बार्बी डॉल’ दिसतेय.

Updated: Aug 23, 2014, 03:58 PM IST
भेटा, 16 वर्षांच्या या ‘रिअल बार्बी’ला! title=

नवी दिल्ली : आजपर्यंत तुम्ही खेळण्यातली सुंदर ‘बार्बी डॉल’ बघितली असेल, पण युक्रेनमध्ये लोलिता रिची नावाची एक चालती-बोलती ‘बार्बी डॉल’ दिसतेय.

अवघ्या १६ वर्षांच्या या बार्बीनं आपणंच खरीखुरी ‘टिनेजर बार्बी’ असल्याचा दावा केलाय. रिची हिची उंची ५ फूट ४ इंच आहे तर कंबर आहे फक्त 20 इंच... ‘बार्बी डॉल’सारखं दिसण्यासाठी रिची निळ्या रंगाचे लेन्स लावते आणि बाहुलीसारखा मेकअपही करते.

रिची स्वतःलाच स्वतःची प्रेरणा समजते. लहान वयापासूनंच रिचीला सुंदर दिसण्याचा आणि चांगले कपडे घालण्याचा छंद आहे. मेकअप करण्यासाठी तिची अभिनेत्री असलेली आईही तिला मदत करते. 

‘काही लोक माझ्या सुंदरतेला पाहून जळतात आणि माझ्यावर कमेन्ट्सदेखील करतात… पण मला या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही’ असंही रिची म्हणतेय. 

या टिनेजर बार्बीच्या म्हणण्यानुसार, तिच्या केवळ डोळ्यांच्या लेन्स आर्टिफिशिअल आहेत... पण, बाहुलीसारखं दिसण्यासाठी आणखी कुठलीही सर्जरी तिनं केलेली नाही.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.