सौदी अरेबियाला भारताची `मिरची लागली`

हापूस आंब्यावर युरोपातील 28 देशांमधील बंदीनंतर आता भारतीय भाज्यांनाही बंदीचा असाच फटका बसतोय.

Updated: May 10, 2014, 02:53 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
हापूस आंब्यावर युरोपातील 28 देशांमधील बंदीनंतर आता भारतीय भाज्यांनाही बंदीचा असाच फटका बसतोय.
सौदी अरेबियाने भारतीय मिरच्यांच्या आयातीवर 30 मेपासून बंदी घातली आहे.
भारतातून आलेल्या हिरव्या मिरच्यांमध्ये किटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याचं चाचण्यामधून स्पष्ट झालं आहे, असं सौदी कृषी मंत्रालयानं भारतीय कृषी आणि अन्नप्रक्रीया उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाला कळवलंय.
भारतीय भाज्यांच्या मोठ्या आयातदार देशांपैकी सौदी अरेबिया हा पाचवा देश हे आणि त्यामुळे शेतमालाच्या देशी उत्पादकांना हा मोठा धक्का आहे. त्यामुळे भाज्यांवर किटकनाशकांचा असाचा वापर सुरु राहिला, तर पुढील काळात ही बंदी कायम राहिल असं सौदी अरेबियानं स्पष्ट केलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.