सीरियामध्ये रशियाचा हल्ला, घाबरला इसिसचा भारतीय दहशतवादी

 सीरियामध्ये रशियाने गेल्या काही दिवसांपासून सुरू केलेल्या हवाई हल्ल्यानंतर इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांमध्ये घबराट पसरली आहे. भारतीय गुप्तचर संस्थेने एक कॉल टॅप केला, त्यात सीरियामध्ये रशियाच्या हल्ल्याने घाबरलेला आयएसमध्ये सामिल असलेला भारतीय दहशतवादी घरी परतण्याबाबत बोलत होता. हा दहशतवादी ६ महिन्यांपूर्वी इसीसमध्ये सामील झाला होता. 

Updated: Oct 9, 2015, 05:13 PM IST
सीरियामध्ये रशियाचा हल्ला, घाबरला इसिसचा भारतीय दहशतवादी title=

नवी दिल्ली :  सीरियामध्ये रशियाने गेल्या काही दिवसांपासून सुरू केलेल्या हवाई हल्ल्यानंतर इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांमध्ये घबराट पसरली आहे. भारतीय गुप्तचर संस्थेने एक कॉल टॅप केला, त्यात सीरियामध्ये रशियाच्या हल्ल्याने घाबरलेला आयएसमध्ये सामिल असलेला भारतीय दहशतवादी घरी परतण्याबाबत बोलत होता. हा दहशतवादी ६ महिन्यांपूर्वी इसीसमध्ये सामील झाला होता. 

गेल्या काही दिवसांपासून सीरीयामध्ये इसीसच्या ठिकाणांवर रशियाने जबरदस्त बॉम्ब वर्षावर सुरू केले आहे. रशियाच्या सुखोई ३४ आणि सुखोई २४ लढाऊ विमानांनी इसीसच्या अनेक ठिकाणांवर हल्ले सुरू केले आहे. सुखोई २४ बॉम्ब वर्षावर करणाऱ्या विमानांनी वायव्य सीरियाच्या इदलीब प्रांताजवळ जिस्र अल शुगुरच्या पर्वतीय भागात एक गोदाम नष्ट केले. हे इसीसचे शस्त्रभंडार होता. 

या दरम्यान सीरियावर करण्यात येणाऱ्या बॉम्ब हल्ल्यावर अमेरिकेने प्रश्न उपस्थित केले आहे. अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने म्हटले आहे की रशियाचे सर्वाधिक हल्ले इसीस आणि अल कायदा समर्थक दहशतवाद्यांऐवजी बशर विरोधी विद्रोहींच्या ठिकाणांवर आहे. 

रशियाने इसीसच्या ठिकाणांवर हल्ला केल्याचा दावा केल्यानंतर अमेरिकेने हे वक्तव्य केले आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.