फ्लोरिडातल्या SpaceX लॉन्चिंग सेंटरवर रॉकेटमध्ये स्फोट

अमेरिकेतल्या फ्लोरि़डामध्ये रॉकेट परिक्षणादरम्यान रॉकेटमध्ये स्फोट झाला.

Updated: Sep 1, 2016, 11:44 PM IST
फ्लोरिडातल्या SpaceX लॉन्चिंग सेंटरवर रॉकेटमध्ये स्फोट  title=

फ्लोरिडा : अमेरिकेतल्या फ्लोरि़डामध्ये रॉकेट परिक्षणादरम्यान रॉकेटमध्ये स्फोट झाला. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास स्पेस एक्स मानवरहित रॉकेटचं परिक्षण सुरु होतं, तेव्हा हा स्फोट झाला. 

या स्फोटाचे धक्के काही मैल लांब असलेल्या इमारतींनाही बसले. एवढच नाही तर बऱ्याच स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं तिथल्या स्थानिकांचं म्हणण आहे. या स्फोटाच्या अर्ध्या तासानंतर आकाशात धूरही पसरला होता. या अपघातामध्ये किती जण जखमी झाले आणि हा स्फोट नक्की कशामुळे झाला याबाबत अजून माहिती उपलब्ध झालेली नाही.